लोकप्रतिनिधी व पदाधिकारी राजपूत समाज बांधवांची मोठी उपस्थिती…
अमळनेर:- हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती अमळनेर शहरात अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीच्या निमित्ताने महाराणा प्रताप चौकातील स्मारक स्थळी असंख्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी राजपूत समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी एकत्रित आले होते.सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन व माल्यार्पण करण्यात आले.यावेळी राणाजींचा प्रचंड जयघोष करण्यात आला.राजुसिंग परदेशी यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांसह येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाटसरूना थंडगार शीकंजीचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील,बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील,संचालक डॉ अनिल शिंदे,समाधान धनगर, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील,कु इशानी वाघ, माजी सभापती प्रफुल पवार, कैलास भावसार,प्रा मंदाकिनी भामरे,जिजाबराव पाटील,श्रीनिवास मोरे,माजी नगरसेवक राजेश पाटील,ऍड राकेश पाटील,संजय पाटील यासह अमळनेर राजपूत एकता मंचचे रणजित पाटील व समाजबांधव उपस्थित होते.