अमळनेर:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची भीती दूर होऊन निर्भयपणे मतदान करण्यासाठी सुमारे ७३० पोलीस कर्मचाऱ्यांचा भव्य रूट मार्च अमळनेर शहरातून काढण्यात आला.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे, शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ,अक्षदा इंगळे,विनोद पाटील, नामदेव बोरकर, सिद्धांत शिसोदे, मिलिंद बोरसे यांच्यासह १८ अधिकारी, अमळनेर उपविभागाचे ९२ अंमलदार, अकोला विभागाचे २५० पोलीस, जळगाव मुख्यालयाचे २२ पोलीस, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे ६० पोलीस, जळगाव येथील १६० होमगार्ड, धुळे येथील १०० होमगार्ड, केंद्रीय पथकाचे आठ पथके असे सुमारे ७३० कर्मचाऱ्यांनी गांधलीपुरा पोलीस चौकीपासून रूट मार्च काढला. राणी लक्ष्मीबाई चौक, सराफ बाजार, वाडी चौक कसाली मोहल्ला, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक,पाच पावली देवी मंदिर मार्गे रूट मार्चचे विसर्जन करण्यात आले.