
अमळनेर:- नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्डच्या निकालात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

ऋषी योगेश झाबक याने 96.2% मिळून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच चि. नमित चेतन जैन 95%, चि. धिरज संदीप धनगर 94.8%, कु. श्रद्धा तुषार पाटील 94.6%, चि. हिमांशू बाळू पांडव 91.6%, चि. संकेत दिनेश शेलकर 91.2% यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. उर्वरित सर्व विद्यार्थी उच्च श्रेणीत व अतिउच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थेचे मार्गदर्शक बजरंग अग्रवाल, डी डी पाटील सर, अध्यक्ष निरज अग्रवाल, चेअरमन सितिका अग्रवाल, प्राचार्य विनोद अमृतकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




