अंगावर लाठ्या काठ्यांचे व्रण, परिसरात उडाली खळबळ…
अमळनेर:- तालुक्यातील मालपूर येथे जुन्या वादातून एकाचा शेत शिवारात खून झाल्याची घटना १९ रोजी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
प्रभाकर विनायक पाटील (वय ४५) यांचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी वाद होता. त्या वादातून त्यांच्यात गुन्हे दाखल होवून खटले सुरू होते. काल १९ रोजी मयताच्या शेतात मुरूम टाकणे सुरू होते. त्यावरून वाद होवून हाणामारीत त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यांचे प्रेत शेतात आठ वाजेच्या सुमारास आढळून आले. त्याच्या अंगावर लाठ्या काठ्यांचे व्रण उमटल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हेकॉ सचिन निकम, मुकेश साळुंखे यांनी भेट दिली. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती असून मयताच्या मुलाने काही जणांची नावे सांगितली आहेत मात्र पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.