डीवायएसपींच्या पथकाची कारवाई, ३.१२ लाखाचा मुद्देमाल जप्त…
अमळनेर:- धरणगावकरून अमळनेरकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणारे डंपर डीवायएसपींच्या पथकाने टाकरखेड्याजवळ पकडत कारवाई केली आहे.
१८ रोजी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना धरणगावकरून अमळनेरकडे अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या सूचनेनुसार पोना प्रमोद बागडे, गणेश पाटील हे धरणगावकडे जात असताना टाकरखेड्याजवळ एमएच १९ सीवाय ९०८५ क्रमांकाचे डंपर वेगाने जाताना दिसल्याने त्यास थांबवले असता डंपरमध्ये २.५ ब्रास वाळू आढळून आली. त्यास विचारपूस केली असता चालकाचे नाव राधेश्याम अर्जुन पाटील (रा. इंदगाव, ता. जि. जळगाव) व क्लिनरचे नाव प्रवीण प्रताप नन्नवरे (रा. बांभोरी ता. धरणगाव) असे समजून आले. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून न आल्याने १२ हजार रुपये किमतीची वाळू व ३ लाख किमतीचे डंपर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोना गणेश पाटील यांच्या फिर्यादी वरून अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ संदेश पाटील करीत आहेत.