
दहीवद व मंगरूळ शिवारातील घटना, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील दहीवद व मंगरूळ शिवारातील रिलायन्सच्या दोन टॉवरवरून अज्ञात चोरट्याने दहा बॅटरी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

विलास घोडके यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दहीवद शिवारातील व मंगरूळ शिवारातील रिलायन्स जिओच्या टॉवरवरून प्रत्येकी १५०० रुपये किमतीच्या दहा बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. आजूबाजूच्या शेतात व परिसरात शोध घेतला मात्र कोणताही तपास न लागल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भादवि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ विजय भोई हे करीत आहेत.




