
ग्रा.पं. सदस्यांसह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला उपोषणाचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील डांगर बु. येथे ग्रामनिधीतून झालेल्या नित्कृष्ट कामांची चौकशी करावी अश्या मागणीचे निवेदन देत ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

२० रोजी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, डांगर बु. येथे सन २०२३-२४ मध्ये ग्रामनिधीतून पेव्हर ब्लॉक, भुयारी गटार, शोषखड्ड्यांची कामे करण्यात आली असून सदरची कामे अतिशय नित्कृष्ट दर्जाची असून ठेकेदाराला वेळोवेळी सूचना केल्यानंतर ही नियोजित आराखड्यानुसार ही कामे झाली नाहीत. तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि इंजिनियर यांना सांगूनही त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. त्यातून मोठा मलिदा लाटण्यात आल्याचा संशय असून सदर नित्कृष्ट कामांमुळे शासनाचा पैसा पाण्यात गेला आहे. ह्या कामांची चौकशी न केल्यास ७ जून पासून कार्यालयात उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदरचे निवेदन देतेवेळी सचिन पाटील, युवराज पाटील, आनंद पाटील, सुदाम सोनवणे, राजेंद्र पाटील, संतोष बैसाणे, सतिष पाटील, संदीप सुतार, मधुकर मोरे, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.




