
धुळे रोडवरील सेंट मेरी स्कूलजवळ आढळला होता बेशुद्ध…
अमळनेर:-येथील धुळे रोडवरील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल मंगरूळ समोर रस्त्यालगत अनोळखी 70 वर्षीय वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडलेला मिळून आल्याने त्यास 108 अंबुलन्सने उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला आहे.

सदर मयताचे वारसाची वाट पाहिली असता कोणीही वारसदार मिळून आलेला नाही. याबाबत धुळे शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करून अमळनेर पो. स्टे. कागदपत्र प्राप्त झाल्याने अमळनेर येथे नोंद झाली आहे. सदर मयत रंगाने सावळा, अंगात पांढऱ्या रंगाचे फुल बाहींचे शर्ट व पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, नाक वाकलेले, दात पडलेले, दाढी वाढलेली व केस पांढरे झालेले, डोक्याचे अर्धवट टक्कल पडलेले केस पांढरे, उजव्या हाताच्या कामेवर श्रीराम असे नाव गोंदलेले असे आहे.
तरी सदर मयताच्या ओळखी बाबत कोणास काही माहिती मिळून आल्यास त्यानी अमळनेर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




