
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे कामानिमित्त आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील राभोरमुल्ला येथील मिनारदास पावरा हा आपल्या कुटुंबासह पाडसे येथे कामानिमित्त आला असून दिनांक २० मे रोजी रात्री १:३० वाजता त्याची पत्नी बिंदाबाई हिने विषारी औषध प्राशन केल्याचे समजल्याने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी तिला हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर धुळे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येवून ती मारवड पोलिसांत वर्ग करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




