
अमळनेर:- कै. उस्ताद भैय्यासाहेब ब्रह्मे यांच्या येथील सुप्रसिद्ध जयगुरु व्यायामशाळा क्र. १ च्या शताब्दीनिमित्त ऍड. केदार ब्रह्मे यांनी लिहिलेल्या ‘कुस्तीवैभव’ या पुस्तकाचे शानदार प्रकाशन जयगुरु व्यायामशाळा क्र.१ मध्ये नुकतेच अमळनेर कुस्तीसंघाचे अध्यक्ष विश्वास उर्फ बाळू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक केदार ब्रह्मे, जयगुरू व्यायामशाळा क्र. १ चे अध्यक्ष सोमनाथ ब्रह्मे ,अमळनेर कुस्तीसंघाचे अध्यक्ष बाळू पाटील, माजी नगरसेवक तथा जयहिंद व्यायामशाळेचे अध्यक्ष प्रताप शिंपी,कोंडाजी व्यायामशाळेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, मुंबई येथील न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे, प्रा. गौतम ब्रह्मे उपस्थित होते.
प्रारंभी आखाडय़ातील श्री हनुमानाची आरती करण्यात आली. त्यास श्रीफळ अर्पण करण्यात आले. न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बाळू पाटील यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. ऍड. केदार ब्रह्मे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका व पुस्तकाबाबत विवेचन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ऍड. केदार ब्रह्मे यांनी प्रताप शिंपी, संजय पाटील यांचा स्वागत व सत्कार केला. न्या. नरेंद्र ब्रह्मे यांनी बाळू पाटील यांना शाल व श्रीफळ दिले. प्रा. गौतम ब्रह्मे यांनी सदर पुस्तक छपाई करणारे एस. के. प्रिंटर्सचे मनीष बडगुजर यांना शाल व श्रीफळ दिले. समीर ब्रह्मे यांनी जयगुरु व्यायामशाळेचे अध्यक्ष सोमनाथ ब्रह्मे यांचा सत्कार केला.
या प्रसंगी ब्रह्मे कुटुंबीय आणि अनेक कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.गौतम ब्रह्मे यांनी केले.




