अमळनेर:- येथील बसस्थानक परिसरात महामंडळाच्या एसटी बसच्या वर्धापन दिनानिमित्ताने १ जून रोजी लालपरीचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.यावेळी बसस्थानक परिसराला सुशोभित करण्यात आले होते. यावेळी बसस्थानक परिसरातील प्रवाश्यांना खडीसाखर,पेढे वाटप करण्यात आले.यावेळी शांताराम चौधरी,अनिकेत न्हयाळदे,तुषार साळुंखे,राकेश वाघ,सचिन पाटील, अमोल पाटील,विशाल कलोसे तसेच महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.