
अमळनेर:- शहरातील धुळे रस्त्यावरील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाबाहेरून २० मे रोजी दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान १५ हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पसार केल्याची घटना घडली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ब्रम्हे गल्लीतील रहिवाशी अनंतराव पाटील यांची (एम एच -१९ बी एस ९६०९ ) दुचाकी त्यांचा मित्र मंगेश पाटील हा कामानिमित्त घेऊन गेला होता.२० रोजी धुळे रस्त्यावरील प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिसबाहेर दुपारी ३ वाजता दुचाकी लावून कार्यालयात गेले होते.४ वाजता कार्यालयाबाहेर आले असता दुचाकी आढळून आली नाही.कुणीतरी अज्ञाताने दुचाकीचे हँडल तोडून दुचाकी लांबविल्याबद्दल अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.




