
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली येथील २८ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पतीने मारवड पोलिसांत दिली आहे.

सदर महिला २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मुलींना घरी एकटे सोडून कुणाला काहीही न सांगता निघून गेली.महिलेचा इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता शोध लागला नसल्याने पतीच्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मारवड पोलिसात करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण करीत आहेत.




