
रत्नप्रवाह प्रवचनमालेत चौथे पुष्प गुंफताना मांडले विचार…
अमळनेर:- मी जीवनात पुरुषार्थ केला, सर्व काही केले परंतु अंतर्मन म्हणते की काही तरी चूक झाली आहे, हे भगवान आपण सांगा मी कुठे कमी पडलो,ये रिश्ता निभायेंगे या विषयावर रत्नप्रवाह प्रवचनमालेत चौथे पुष्प गुंफताना रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी आपले विचार मांडले.

याप्रसंगी प्रवचनप्रभाविका साध्वी संवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या. जीवन जगत असताना पाच प्रकारची मानसिकता समाजामध्ये असते एक कॅल्क्युलेटेड मानसिकता, दोन क्लाऊड मानसिकता, कॅकट्स, सायकल सारखी मानसिकता आणि मेनबत्ती सारखी मानसिकता. या संबंधि सविस्तर माहिती उदाहरणासह गुरुदेवांनी दिली. कॅल्क्युलेटर मानसिकता- आमचे वस्तूवर प्रेम आहे माणसांवर प्रेम नाही,ज्यांनी मला जीवनात मदत केली त्यांनाच मी मदत करणार ही मानसिकता.आई-वडिलांची उप उपयुक्तता संपली की त्यांनाही वाईट वागणूक दिली जाते, आपल्या घरी, दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या वेदनेशी नातं जोडले पाहिजे, त्यांना मनापासून मदत केली पाहिजे. क्लाऊड मानसिकता- हवेच्या दिशेने ढग निघून जातात तसे माणूस नातं विसरून चांगल्या वाईट गोष्टी मागे आकर्षित होतो, आता कोणा सोबत कोण किती वेळ राहील सांगता येत नाही. ही आहे क्लाऊड मानसिकता. कॅकटस-काटेरी वनस्पती दुरून छान दिसते पण जवळ गेले हात लावला की रक्त काढते अशा मानसिकतेची माणसं समाजात असतात. पूर्वी पाहुणे आलेत की आनंद व्हायचा आता पाहुणे आलेत की आनंद होत नाही त्यामुळे पाहुणे येणे कमी झाले आहे.शिक्षण संपत्ती आणि सौंदर्याच्या मागे आम्ही धावत आहोत परंतु संस्काराकडे दुर्लक्ष होत आहे. सायकल सारखे संबंध- सायकलच्या टायर मध्ये हवा आहे तोपर्यंत सायकल चालेल हवा संपली सायकल सोडून दिली अशी आहे मानसिकता. मूक बधिर दुर्बलांना मदत करण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे. कॅण्डल-मेणबत्ती सारखे जीवन जगले पाहिजे, मी हळू संपून जाईल पण शेवटपर्यंत प्रकाश देईल. संस्काराप्रती आदर ठेवावा जीवनात त्याग करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.यांनी केले.याप्रसंगी अमळनेरच्या मिड टॉउन हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष उपस्थित होते.




