
अमळनेर:- येथील 49 बटालियन तर्फे एनसीसी प्रशिक्षण शिबिरास प्रताप महाविद्यालयात सुरुवात झाली असून १ जून ते १० जून पर्यंत हे दहा दिवशीय शिबिर होणार आहे.

49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर ची स्थापना 1964 साली झाली असून तेव्हापासून अमळनेर सह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध शहरात एनसीसीच्या कॉलेज व शाळेत शाखा आहेत,या शाळा तसेच कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असते. नुकत्याच आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील शालेय तथा महाविद्यालयीन ४३० प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत . प्रशिक्षणास ६ एएनओ , १० पीआय स्टाफ , ०४ जेसीओ व १ सैनिक अधिकारी प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणास पहाटे साडेपाचला सुरुवात होऊन पिटी, योगा, ड्रिल, मॅप रीडिंग, शस्त्रास्त्र प्रशिक्षण, आरोग्य प्रशिक्षण, पर्यावरण रक्षण असे रात्री दहापर्यंत सर्व प्रशिक्षण सुरू असते. सायंकाळी आलेले प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी एक कॅम्प व बटालियन द्वारे तीन ते चार कॅम्प होतात. यातून काही विद्यार्थ्यांची थलसेना कॅम्प, प्रजासत्ताक कॅम्प दिल्ली परेडसाठी निवड केली जाते. त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी तयार केले जाते .
एनसीसीच्या ए.बी.व सी. प्रमाणपत्र परीक्षेची तयारी करणे, सैनिक भरतीचे विविध प्रशिक्षण देणे, समाज सेवा करणे, आपत्कालिन सेवेसाठी तयारी करणे, पर्यावरण रक्षण करणे, राष्ट्रीय एकात्मता इ. विषयावर या प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन केले जाते.दहा दिवसीय एनसीसी प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची सर्व शारीरिक व मानसिक तयारी कॅम्प कमांडर कर्नल पिनाकी बनिक, डिपटी कॅम्प कमांडर लेफ्टनंट प्रमोद चौधरी, कॅम्प अँड्र्यूजट लेप्टनंट हितेश पवार, फस्ट ऑफीसर विकास दाभाडे, कॅम्प कोर्टरमास्टर सेकंड ऑफिसर शैलेंद्र गिरसे, ट्रेनिंग ऑफिसर सुभेदार मेजर एसएम धरमवीरसिंग, सुभेदार तिवारी, सुभेदार जान महम्मद, बीएचएम, हवालदार शांताराम पाटील व इतर प्रशिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता बटालियनचे मुख्यलिपीक सुनील सोनार, अकाउंटट व्हीके सूर्यवंशी व इतर कर्मचारी करीत आहेत.




