
अमळनेर :- तालुक्यातील नगाव येथील एका ५५ वर्षीय इसमाने विषारी औषध घेऊन मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी घडली असून याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरुण हरी पाटील (वय ५५) रा.नगाव बु ता.अमळनेर याने दि.२३ मे रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या घराशेजारी असणाऱ्या खळ्यात काहीतरी विषारी औषध प्राशन करून घरी येऊन सदरील घटना सांगितल्यावर त्याला लगेच अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सुकलाल हरी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण काय याचा पोलीस तपास करीत आहेत.




