अमळनेर:- चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील २६ वर्षीय विवाहित महिला संत सखाराम महाराज यात्रेतून बेपत्ता झाल्याची घटना घडली.
चुंचाळे येथील इसम आपली पत्नी व मुलीला घेऊन ३ रोजी दुपारी पैलाड येथील आपल्या मावशीकडे आला. रात्री ९ वाजता ते यात्रेत फिरायला आले. जहाज पाळण्यात बसण्यासाठी तिकीटला पैसे मागण्यासाठी तो पत्नीकडे गेला असता त्याला मागे पत्नी दिसून आली नाही. त्याने आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्याची पत्नी मिळून आली नाही. म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.