
अमळनेर:- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरी करण्यात आला.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच भाऊसाहेब आप्पा पाटील, गावाचे तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी, लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करत गुढी उभी करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी,अरुण पाटील, ग्रामसेवक किरण लंकेश, शिपाई ज्ञानेश्वर पाटील, रोजगार सेवक संतोष पाटील, पुरुषोत्तम चौधरी, जयवंत पाटील, साहेबराव पाटील, गोकुळ पाटील,निंबा चौधरी, राजेंद्र पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार लोकनियुक्त सरपंच वर्षा पाटील यांनी मानले.




