
गोवर्धन येथील घटना, तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन येथील भावाला व त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ४ रोजी रात्री ११:३० वाजता रत्नाबाई सुरेश पवार (वय ४०) ह्या घरी परिवारासह झोपलेल्या असताना शेजारी राहणारे जेठ गोविंदा लक्ष्मण पवार, त्याची पत्नी रमणबाई पवार व मुलगा जयेश पवार यांनी घराच्या दरवाज्याला लात मारून दरवाजा उघडत फिर्यादी महिलेला व तिचे पती सुरेश पवार यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुम्हाला संपवून टाकू असे म्हणत जीव मारण्याची धमकी दिल्याने तिघांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे करीत आहेत.




