रत्नप्रवाह प्रवचन मालेचे नववे पुष्प गुंफताना केले विवेचन…
अमळनेर:- मन काहीही करायला सांगेल, जागृत मन काय म्हणते ते महत्त्वाचे आहे. परिवारात शब्द जपून वापरा परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात आहे. असे कळकळीचे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.स. यांनी केले ते अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत नववे पुष्प गुंफताना बोलत होते.या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या.
“जीवन जगण्याची जडीबुटी” या विषयावर प्रवचन करतांना गुरुदेवांनी पाच गोष्टी सांगितल्या.१)आपल्या स्वभावावर जागृत मन सेट करा- तुमचा क्रोध चांगला नाही. हे तुमचे जागृत मन सांगते. तुमच्यातील कमजोरी दूर करण्याची ताकद तुमच्यात आहे. शरिराचे बरेच रोग दूर होऊ शकत नाहीत. परंतु मनाचे सर्व रोग दूर होऊ शकतात.तुमचा स्वभाव चांगला ठेवणे तुमच्या हातात आहे.चांगले बनण्यासाठी तुम्हांला कोणी थांबवू शकत नाही.मनाचे नाहीतर जागृत मनाचे ऐका. २)कनेक्ट व्हा- चांगले विचार,व्यक्ती व संस्काराशी जोडले जा. चांगले मित्र जोडा, चांगली पुस्तके वाचा. तुम्ही कमजोर असल्याने प्रवचनाचा प्रभाव फार काळ राहत नाही. चांगल्या वातावरणात चांगल्या ठिकाणी रहा, वाईट गोष्टी सोडून द्या. तुमचा फॅमिली गुरु आहे का? तुमच्या जीवनाला वाचविण्याची ताकद तुमच्यात आहे. ३)शक्ती काँट्रिब्युट करा- तुमच्याकडे असलेल्या शक्तीचे वाटप करा.चांगल्या क्षेत्रात आपला हिस्सा किती? तुम्ही चॅरिटी करता का?देण्याची वेळ येते तेव्हा नकार देऊ नका. देण्याची सवय ठेवा तुम्ही जीवनात कोणाचे अश्रू पुसले, कोणाच्या चेह-यावर हास्य आणले आहे का ? ४)शब्दांला कंट्रोल करा- परिवारात शब्द जपून वापरा. शब्दांचा रोल महत्त्वाचा आहे.परिवारात शब्दावर निमंत्रण ठेवा, कमीतकमी तुम्ही ज्यांच्या सोबत राहतात. ज्यांची सेवा घेतात. त्यांच्याशी तरी चांगले शब्द वापरा. ५)स्वार्थ वृत्तीला कन्व्हर्ट करा- मी वाईट बोलतो, आता पासून चांगले बोलेल. नाश करण्याची भाषा करू नका. कन्व्हर्ट करण्याची भाषा करा. मनापासून काही वाईट गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करा. अनेक गोष्टी कठिण आहेत.पण अशक्य नाहीत. या संबंधी विविध उदाहरणे गोष्टीच्या स्वरुपात प्रेरणादायी विवेचन करून श्रोत्या वर्गाला मंत्रमुग्ध केले. प्रवचन ऐकण्याची सवय लावण्याचे काम प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा यांनी केले. या प्रसंगी अमळनेर येथील मिडटाऊन हॉल मध्ये मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष उपस्थित होते.