
निंभोरा येथील घटना, पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे मुलांच्या मजाक वरून झालेल्या भांडणात मुलांसह महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

निंभोरा येथे १२ रोजी सायंकाळी ७ वाजता ग.भा. वैशाली बाळू भील ह्या आपला मुलगा कृष्णा बाळू भील याच्यासह अंगणात बसलेले असता घराजवळ राहणारे विश्वास मगन कोळी, गायत्री विश्वास कोळी, मंजुळा मगन कोळी हे आले. व मुलांच्या मजाक केल्याच्या वादातून विश्वास याने कृष्णा याला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गायत्री व मंजुळाबाई यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. वैशाली भील ह्या मध्यस्थी करायला गेल्या असता त्यांना ही लाकडी दांडक्याने मारहाण केली. गावातील लोकांनी त्यांची सोडवणूक केली. वैशाली भील यांनी मारवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




