अमळनेर:- तालुक्यातील धार येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.
धार येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी १३ रोजी ऍडमिशन करता तीन हजार रुपये घेवून मारवड येथे कॉलेजला जावून येथे असे सांगून घरून निघाली. सायंकाळ झाली तरी ती परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र कोणताही तपास न लागल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. मारवड पोलिसांत अज्ञात इसमाने मुलीच्या अल्पवयीन पणाचा फायदा घेवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली असून पुढील तपास पोहेकॉ सुनील तेली करीत आहेत.