
दोघे जखमी, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस फाट्याजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील लोण सिम येथील रोहित दिलबर भील (वय २० वर्ष) व त्याचा मामा शरद सुनील भील (रा. थाळनेर) हे ४ रोजी १२ वाजेच्या सुमारास पाण्याचा जार घेण्यासाठी जात असताना भरवस फाट्याजवळ ट्रॅक्टर क्रमांक एमएच १८ टी ७६५८ वरील चालक बापू साहेबराव पाटील याने समोरून येत दुचाकीला धडक दिली. अपघातात रोहित आणि शरद या दोघांच्या डाव्या गुडघ्याला जबर मार लागला तसेच दुचाकीचे ही नुकसान हे झाले. त्यामुळे दोघांच्या गुडघ्यावर धुळे येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचार घेतल्यानंतर रोहित भील याने ट्रॅक्टर चालक बाप्पू पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास हेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.

