
तालुक्यातील समस्त समाजबांधवांनी दिली उपस्थिती…
अमळनेर:- तालुका राजपूत एकता मंच व महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती यांच्या वतीने क्रांतिसूर्य वीर शिरोमणी
महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 484 वी सार्वजनिक जयंती निमित्त 9 जून रोजी भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली.

यानिमित्ताने महाराणा प्रताप चौकातील राणाजींच्या स्मारक स्थळी फुलांनी विशेष सुशोभीकरण करण्यात आले होते. सुरवातीला सकाळी समाजबांधवांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सायंकाळी रथावरील राणाजींच्या प्रतिमेचे पूजन खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील खा. शी. मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, योगेश मुंदडा, प्रदिप अग्रवाल, नीरज अग्रवाल,डॉ संदेश गुजराथी, हरी भिका वाणी, अध्यक्ष जितेंद्र झाबक, प्रकाशभाई पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते व संचालक मंडळ,मार्केटचे सभापती अशोक आधार पाटील व संचालक मंडळ यासह विविध मान्यवर आणि लोकप्रतिनिधीच्या हस्ते होऊन मिरवणुकीस सुरवात झाली,बँड पथकाच्या तालावर ही मिरवणूक स्टेशन रोड,मंगलमूर्ती पतपेढी,पोस्ट ऑफिस चौक, महाराणा प्रताप मित्र मंडळ येथे पोहोचल्यावर या मंडळाने मिरवणुकीचे स्वागत केले.अध्यक्ष विनोद अग्रवाल व मान्यवरांनी माल्यार्पण केले.विशेष म्हणजे यावेळी वरूण राजाने जोरदार हजेरी लावून देखील उत्साही तरुणांनी भर पावसात महाराणांच्या गीतांवर ठेका धरला. आयसीआयसीआय बँक,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह व तेथून सानेगुरुजी शाळेत समारोप करण्यात आला. सदर मिरवणुकीत शहर व ग्रामीण भागातील सर्व राजपूत समाजबांधव, महिला भगिनी आणि महाराणा प्रताप प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सानेगुरुजी शाळेत आलेल्या सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.मिरवणूक यशस्वीतेसाठी अमळनेर तालुका राजपूत एकता मंच व अमळनेर तालुका महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीने परिश्रम घेतले.




