
अमळनेर:- शहरातील वार्ड १५ मध्ये प्रताप शिंपी यांच्या मदतीने नादुरुस्त बोअरवेल सुरू केल्याने त्या भागातील पाणी प्रश्न सुटला आहे.

वार्ड क्रमांक 15 मधे सोमेश्वर महादेव मंदिर, हनुमान नगर येथे गेल्या काही दिवसापासून मोटर खराब झाली होती. हा विषय नगर सेवक प्रताप शिंपी यांना सोमेश्वर महादेव मंदिर अध्यक्ष कैलास पाटील व परिसरातील नागरिक संतोष सोनार, बबलू पाटील, अनिल पाटील, आबा मराठे व महिलांनी लक्षात आणून दिला. त्यानंतर शिंपी यांनी पाणी पुरवठा अधिकारी विभागाला सांगून नवीन मोटर बसवण्यात आली व बोअरवेल सुरू करण्यात आला.




