
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी प्र. जळोद येथील १७ वर्षीय तरुण कामाला जातो असं सांगून घरून निघाला मात्र तो परत घरी न आल्याने अमळनेर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील पिंपळी प्र. जळोद येथील आकाश गोरख थोरात (वय-१७) हा आपल्या कुटुंबासह राहतो.१२ जून रोजी सकाळी ७ वाजता कामाला जातोय असे सांगून तो घरून निघाला मात्र सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने कुटुंबाने आकाशचे मित्र,नातलग यांच्याकडे विचारपूस केली.मात्र आकाश कुठेही न आढळल्याने पालकांनी अमळनेर पोलीसात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.




