पिके,बियाणे,सुपीक माती वाहून गेली, मंत्री पाटील यांचे पंचनाम्याचे आदेश…
अमळनेर:- तालुक्यात तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
१७ रोजी रात्री अतिवृष्टी झाली. शिरूड मंडळात ८१ मिमी पाऊस पडला मात्र प्रत्यक्षात लोंढवे, निसर्डी, वाघोदे, खडके, जानवे शिवारात ढगफुटी सारखा पाऊस झाला. पातोंडा शिवारात ६८ मिमी, मारवड मंडळात ६७ मिमी पाऊस झाला. अमळनेर ३९, नगाव ४५, अमळगाव ३०, भरवस ११, वावडे १० असा सरासरी ४३.८८ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत ८३.२७ मिमी पाऊस झाला आहे.
निसर्डी येथे भरत पाटील, गुलाब पाटील ,चुनीलाल पाटील , राजू पाटील, महादू पाटील यांच्या शेतातून दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रवाहात पाणी वाहत होते. शेताचा तलाव झाला होता. राजेंद्र फुला पाटील जानवे, वाघोदे येथे शिवाजी पाटील ,रवींद्र पाटील यांच्या शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने दगड वाहून आले, शेतातील माती व पिके वाहून गेली. माळण नदीत झाडे अडकल्याने पाणी आजूबाजुला घुसल्याने गुरे वाहून चालली होती. ऐनवेळी दोर कापल्याने गुरे वाचवण्यात आली. लोंढवे येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून नाल्यामुळे गावाला वेढा पडला होता.लोटन पाटील, वाल्मिक पाटील, सुकलाल धनगर, अर्जुन धनगर,दिलीप पाटील, भिकन पाटील,आनंदा पाटील, श्रीराम पाटील, अमृत पाटील,अधिकार पाटील, प्रवीण पाटील,मधुकर पाटील, विनायक पाटील ,रवींद्र पाटील , दीपक पाटील , धनराज पाटील , रामभाऊ पाटील ,राजेंद्र पाटील , सुरेश पाटील,नंदलाल पाटील, चतुर पाटील, कैलास पाटील , भटावाई पाटील,झाम्बर पाटील , निलाबाई पाटील, भटू पाटील, प्रवीण पाटील, दौलत पाटील, जिजाबराव पाटील, वेडु पाटील, गुलाब खैरनार, लक्ष्मीबाई खैरनार, भीमराव पाटील, भाऊराव पाटील यांच्या शेतांमध्ये पाणी घुसून कापसाची पिके वाहून गेली. तर चार दुकानात पाणी घुसून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सबगव्हाण येथे वीज पडून भालेराव शिवराम पाटील यांची म्हैस मरण पावली आहे.
डॉ अनिल शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा सुभाष पाटील, पंकज पाटील,बाळासाहेब पाटील , सरपंच भारती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
प्रतिक्रिया…
तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारींना तातडीने पंचनामे करण्यास सांगून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्याना देखील सुरुवात झाली आहे.- अनिल पाटील
मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य
प्रतिक्रिया…
शेतकऱ्यांनी मे मध्ये लागवड केली आहे. आणि शासनाने १५ जून पासून पीक विमा काढण्यास परवानगी दिली आहे. मात्र तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने शेतकऱ्यांचा विमा काढला गेला नाही. तत्पूर्वीच बियाणे ,शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने निकष बदल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
-प्रा सुभाष पाटील, शेतकरी नेते, अमळनेर