
विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आगरप्रमुखांचे आवाहन..
अमळनेर :- तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार आता शाळेतच पास वितरित केले जाणार असून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख इम्रान पठाण यांनी केले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली असून शाळा सुरू झाल्या आहेत.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करत असतात.शासनाच्या नवीन धोरणानुसार या वर्षी शाळेतच विद्यार्थ्यांना महामंडळाच्या सवलतीच्या दरात तर ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकरिता अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत पासेस वितरित करण्यात येणार आहे.
एम.डी. डॉ. माधव कुसेकर तसेच जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगारप्रमुख इम्रान पठाण,स्थानक प्रमुख चंदू चौधरी, वाहतूक नियंत्रक एल. टी.पाटील, विजय वाडेकर, योगेश घोडके, प्रकाश भालेराव, नितीन पाटील यांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन योजनेची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना फॉर्मचे वाटप सुरू केले आहे.




