
नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी, शासकीय मदत मिळून देण्याची दिली हमी…
अमळनेर:- तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी खासदार श्रीमती स्मिता वाघ व ग्रामस्थ उपस्थित होते.

सोमवार दिनांक १७ जुन रोजी रात्री अमळनेर तालुक्यातील लोंढवे, निसर्डी, खडके, वाघोदे, जानवे, शिरूड येथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली होती व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मा.जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी लोंढवे, निसर्डी, खडके, वाघोदे, शिरूड या गावांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून समस्त शेतकऱ्यांना धीर दिला व लवकर पंचनामा करून शासकीय मदत मिळून देण्याची हमी दिली.