
अमळनेर:- येथे माहेश्वरी समाजातर्फॆ महेश नवमी (माहेश्वरी समाजाचा उत्पत्ति दिवस) उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक १५ जून रोजी भगवान शिवजी यांची भव्य मिरवणुक डी. जे. आणि फटाक्यांच्या गजरात काढण्यात आली, ही मिरवणुक वसई देवी मंदिरापासुन, सुभाष चौक, नगरपालिका, महाराणा प्रताप मार्ग, पंजाब नैशनल बँक, बोहरी पेट्रोल पंप पासून शिवाजी महाराज उद्यान जवळील शिव मंदिरात महेश वंदना व आरती करण्यात आली तेथुन पुढे स्वामीनारायण मंदिर येथे मिरवणकीचा समारोप करण्यात आला.
त्यानंतर स्वामीनारायण मंदिरात गुण गौरव सम्मान समारोह आयोजित करण्यात आला,शैक्षणिक क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले त्यांना समाजातर्फे सन्मान पत्र आणि आकर्षक भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर भूषण बिर्ला आणि परिवाराकडून महेश नवमीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अवयुक्त संजोग बिर्ला याने शंकराची वेशभूषा धारण केली,बिर्ला परिवाराचा सत्कार अमळनेर तालुका अध्यक्ष पंकज मूंदड़ा, शहर अध्यक्ष दिनेश माणियार, तालुका सचिव गणेश कलंत्री, शहर सचिव रामानंद गिलड़ा यांनी केला. सूत्र संचालन उमेश मूंदड़ा यानी केले. यावेळी गोविंद मुंदडा, विजय बलदवा, ओमप्रकाश मुंदड़ा, नरेंद्र मूंदड़ा, गोपाल मुंदडा , ओमप्रकाश मणियार, गोविंद कलंत्री, हरिकिशन मूंदड़ा,राजीव मुंदडा, भूषण बिर्ला, किशोर माणियार, सुभाष मणियार, ओमप्रकाश लाठी, लालचंद सामरे, आकाश बल्दवा,मधुसूदन लाठी,सुनील बल्दवा, राकेश माहेश्वरी, विवेक लाठी,गोविंद मूंदड़ा,तुळशीराम गिलडा, किरण मणियार,अशोक मुंदड़ा महेश मूंदड़ा,संजीव मुंदडा, संदेश मनियार ,हरनारायणजी गिलड़ा, शांतीलाल कोठारी, दगडूशेठ पोरवाल, प्रकाश पोरवाल, अजय पोरवाल, हर्षल पोरवाल, योगेश गिलड़ा, प्रसाद सामरे, प्रितेश मणियार,प्रशांत मुंदडा, अनिकेत मूंदड़ा,अभिनय मुंदडा, मुकेश मुंदडा,जितेंद्र झंवर, महेश झंवर, पंकज झंवर, मंगेश झंवर, नंदकिशोर झंवर,पुष्कर मुंदडा,व समस्त माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते.माहेश्वरी महिला मंडळ यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.




