
दापोरी, मठगव्हाण येथे कृषी अधिकारी खैरनार यांचे आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील मठगव्हाण, दापोरी, लाडगाव येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवाडा साजरा करण्यात आला. तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

या कार्यक्रमावेळी माती परीक्षण, जमीन आरोग्य पत्रिका वाचन व परीक्षणानुसार द्यावयाच्या खतांच्या मात्रांविषयी मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी माहिती दिली. तसेच कापूस पिकात आंतरपीक म्हणून उडीद,मूग, चवळी, तुर यांची लागवड करण्याबाबत आव्हान करण्यात आले. तसेच कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांनी कपाशीसाठी बेसल डोस देण्याबाबत व कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात दिली. सदरील पंधरवड्यामध्ये रोज वेगवेगळ्या गावी शेती विषयक सर्व योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक निलेश पाटील, चेतन चौधरी अनिकेत सूर्यवंशी, दीपक चौधरी, योगिता लांडगे, कविता बोरसे, मालू बेडसे, सागर चौधरी, कृषी पर्यवेक्षक , प्रवीण पाटील व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




