अमळनेर:- चला योगा करूया या,आयुष्य वाढवू या, या संकल्पनेनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दि 21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव जनता सहकारी बँक लि.शाखा अमळनेर हे सदर कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. सदर महोत्सवात पुणे येथून प्रशिक्षित होऊन झालेल्या योग प्रशिक्षिका अमळनेरच्या सुपुत्री कु.वैशाली तोलानी योगाचे धडे देणार आहेत.सदर महोत्सव नव्यानेच हिरवेगार नंदनवन साकारलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,न्यू प्लॉट,अमळनेर येथे सकाळी ठीक 6.30 वाजता होणार आहे. यावेळी प्रवेश निशुल्क असून सर्व सन्माननीय पुरुष बांधव व महिला भगिनींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.