
अमळनेर:- हिवताप प्रतिरोध महिना जून 2024 या महिन्यात (डेंगू, जेई, चिकनगुनिया, चंडीपुरा व हत्तीरोग) या आजारांविषयी प्रार्थमिक केंद्र, व उपकेंद्र स्तरावर जनतेमध्ये जनजागृती करण्यात यावी या उद्देशाने हिवताप प्रतिरोध प्रतिरोधन महिना जून 2024 चे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात हिवतापाची लक्षणे उपचार प्रतिबंधन उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. औषध योजनांची माहिती देण्यात आली. सर्वेक्षण करून रक्त नमुने घेण्यात आले ग्रामपंचायत मार्फत फवारणी दास उत्पत्ती स्थानके नियंत्रणासाठी गप्पी मासेचे महत्व सांगून गप्पी मासे सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली.व सभेत जनजागृती करण्यात आली, शालेय विद्यार्थ्यां मार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली, बस स्थानक आठवडे बाजार यांच्या ठिकाणी माहितीपत्रक लावण्यात आले. हिवताप प्रतिरोध महिन्यासाठी सामाजिक संस्थांचे देखील सहकार्य देण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ बाळासाहेब वाभाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांनी तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी हिवताप प्रतिरोध महिना कसा साजरा करावा या संदर्भात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन सूचना दिल्या.




