मंगल पोत व पर्समधील रोख रक्कमेवर मारला डल्ला…
अमळनेर:- येथील बस्थानकावर अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळयातील मंगल पोत व पर्स मधील रोख रक्कम असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनी राजाराम चव्हाण (रा.धुळे) ह्या पती राजाराम चव्हाण व मुलगी वैशाली बडगुजर यांच्या सोबत २० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुऱ्हाणपूर- शिर्डी बस (क्र. एम एच १४ बी टी २२०४) मध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने गळयातील १२ ग्रॅम वजनाची ३६ हजार किमतीचे मंगळपोत काढून घेतली. तर मुलगी वैशाली बडगुजर हिच्या पर्समधून ६ हजार रुपये रोख व बँकेचे एटीएम चोरीला गेल्याचे आढळून आले असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.