
भरवस येथील दुसऱ्या गटातर्फेही पोलिसांत फिर्याद, दहा जणांविरुद्ध गुन्हा…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे झालेल्या भांडणावरून पोलिसांत फिर्याद दिल्याचा राग आल्याने दहा जणांनी मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

याबाबत उषाबाई भील (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ रोजी त्यांचा भाऊ रमेश देविदास मालचे व युवराज सेना ठाकरे यांच्यात भांडण झाले. रमेश याने त्याबाबत फिर्याद दिल्याने त्याचा राग येवून सुमन विश्वास ठाकरे, कविता योगेश ठाकरे, नीलाबाई युवराज ठाकरे, कविता कैलास ठाकरे, मंगल राजू ठाकरे, रमण जंगु ठाकरे, प्रवीण विश्वास ठाकरे, हिराबाई दयाराम ठाकरे, सुनीता संतोष सोनवणे, लताबाई संतोष सोनवणे यांनी येवून पोलीस ठाण्यात तक्रार कशी देतात असे म्हणत शिवीगाळ करून फिर्यादी व तिची बहीण सरलाबाई छगन भील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बहिणीची मुलगी मयुरी छगन भील हीचे केस ओढून तिलाही मारहाण केली. यावेळी प्रवीण विश्वास ठाकरे याने फिर्यादीला मारहाण करून अंगावर ओढत लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यावरून मारवड पोलिसांत वरील दहा जणांविरुद्ध विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम करीत आहेत

