अमळनेर:- अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिचा हात धरून लगटपणा करणाऱ्या तरुणावर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इयता आठवीत शिक्षण घेणारी १३ वर्षीय मुलगी आई वडील शेतात गेल्याने घरी एकटी होती.१४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील तरुण कमलेश आसाराम बाविस्कर हा घराच्या ओट्यावर आला.त्याला काय करतोय याबाबत विचारले असता तो सहज आलो होतो. लगेच जातोय असे सांगितल्यावर पीडित मुलगी घरात घुसल्यावर कमलेश तिच्या मागे घरात घुसला व घराचा दरवाजा बंद करून हात पकडत तोंड दाबून माझ्याची लगट करण्याचा प्रयत्न करीत असतांना मावशीने घराचा दरवाजा वाजविण्यास सुरुवात केली.त्यात कमलेश घराचा खिडकीतून बाहेर पळून गेला.सायंकाळी आई वडील शेतातून घरी आल्यावर त्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर कमलेश बाविस्कर विरुद्ध अमळनेर पोलिसांत भादवि कलम ३५४, ३५४ अ तसेच बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.