दोन महिलांचा विनयभंग, एकाचे डोके फोडले…
अमळनेर:- मुंदडा नगर भागात मुलांच्या भांडणात दोन कुटुंबात हाणामारी होऊन दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
मुंदडा नगर १ मधील किशोर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हा मुलांच्या भांडणावरून एका मुलाला मारत होता. मुलाचे वडील त्याला विचारायला गेले असता तो मुलाच्या आईला अश्लील शिवीगाळ करू लागला. व तिचा पंजाबी ड्रेस फाडून विनयभंग केला. तसेच पती आवरायला गेला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला किशोर पाटील विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे महिलेने फिर्याद दिली की, २६ रोजी संध्याकाळी ७ वाजता गल्लीत भांडण चालू असताना त्याठिकाणी बोलायला गेली असता प्रभाकर भाईदास पवार व भाग्यश्री प्रभाकर पवार त्याठिकाणी आले व त्यांना गैरसमज होऊन त्यांनी त्यांच्या मुलीला बोलते असा गैरसमज करून मारहाण सुरू केली प्रभाकर याने विनयभंग केला व नंतर पती किशोर पाटील यांच्या डोक्यात काठी टाकून दुखापत केली.म्हणून दोन्ही पती पत्नी विरुद्ध विनयभंग, मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.