
अमळनेर:- पोलीस भरतीसाठी गेलेल्या अक्षयचा मृत्यू तेथील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचे स्पष्ट दिसत असून यापूढे अमळनेर तालुक्यातील कोणत्याही तरुणास पोलीस भरती किंवा अन्य कोणत्या दलात भरतीसाठी जावयाचे असल्यास त्यांचे ईसीजी व मेडिकल फिटनेस नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे मोफत केले जाईल असे खा.शि.मंडळ व बाजार समितीचे संचालक डॉ.अनिल शिंदे यांनी जाहीर केले आहे.
घटनेची माहिती मिळताच डॉ.शिंदे यांना मिळताच त्यांनी बिऱ्हाडे कुटुंबीयांची भेट घेऊन समाजबांधवांशी चर्चा केली. भरतीस्थळी वैद्यकीय सुविधांची असलेली कमतरता तसेच त्यानंतर झालेला हलगर्जीपणा याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. तरुणाचा बळी गेल्याने संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे असेही त्यांनी सांगितले. तसेच तरुणांनी देखील पोलीस भरतीची जिद्द ठेवताना आपल्या शारीरिक स्थितीचाही विचार करावा,शक्यतोवर तरुणांनी आपले मेडिकल फिटनेस केल्याशिवाय भरतीसाठी जाऊच नये,आर्थिक परिस्थिती मुळे ते टाळणे योग्य नसून अश्यानी नर्मदा मेडिकल फाऊंडेशनला कधीही यावे तरूणाईच्या सुरक्षेसाठी आम्ही मोफत सेवा देण्यासाठी तत्पर आहोत असेही त्यांनी सांगितले.




