
अमळनेर:- तालुक्यात जवखेडा, आंचलवाडी शिवारात परिसरात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खासदार स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे याठिकाणी कित्येक एकर शेती वाहून गेली आहे. २७ रोजी सायंकाळी ही अतिवृष्टी झाली.यावेळी गाव दरवाज्याच्या बाहेर नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावात प्रवेश करणे अवघड झाले होते. पेरणी होऊन पिके उगवली होती मात्र अतिवृष्टीने पिके तर काही शेतातली माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पाहणी दरम्यान स्मिता वाघ यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.यावेळी त्यांच्यासोबत प्रभाकर पाटील, भगवान पाटील,जिजाबराव पाटील, चुडामण पाटील,प्रशांत पाटील, नेताजी पाटील,शरद पाटील, सुनिल पाटील,सुरेश पाटील, सुदाम पाटील,विशाल पाटील, मयुर गोसावी,मनोज पाटील, भुषण जैन,मुरलीधर पाटील, छोटु पाटील,तलाठी स्वप्निल कुलकर्णी, कृषी सहाय्यक दिपाली सोनवणे,कुणाल पाटील व गावातील ज्येष्ठ मंडळी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.