अमळनेर:- अल्पवयीन मुलीचा आंतरजातीय विवाह होत असल्याची माहिती मिळताच मारवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विवाह थांबवला.
तालुक्यातील पाडळसरे येथील तरुणाचा विवाह जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका अल्पवयीन मुलीशी होत असल्याची माहिती मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हेडकॉन्स्टेबल फिरोज बागवान, संजय पाटील, तुषार वाघ, अनिल राठोड, भरत ईशी, भरत गायकवाड, सुनील आगोने याना घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी संशयित तरुण आणि अल्पवयीन मुलगी याना ताब्यात घेतले. पोलिसांनी नेरी पोलिसांना फोन करून संबंधित मुलीचे आधारकार्ड मागवले असता तिचे वय फक्त १२ वर्षे असल्याचे समजले. मुलाच्या नातेवाईकांनी देखील आमचे फक्त बोलणे सुरू होते. वय कमी असल्याने आम्ही देखील मुलीचे वय पूर्ण झाल्यावर लग्न करणार आहोत असे सांगितले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या प्रमुख व्यक्तींकडून लेखी घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मारवड पोलीस वेळेवर पोहचल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.