मोबाईल हॅन्डसेटसह, रोख रक्कम केली लंपास…
अमळनेर:- शहरातील भागवत रोडवर एकाच रांगेतील चार दुकाने अज्ञात चोरट्याने फोडत मोबाईल हॅन्डसेट सह,असेसरीज व रोख रक्कम लंपास केली आहे.
दि ३० च्या रात्री ही घटना घडली आहे.चोरट्यानी चारही दुकानाचा छतावरील पत्रा कापून आत प्रवेश केला, यात मोनू चौधरी यांच्या मोनू मोबाईल या दुकानातून रिपेअरिंग साठी आलेले चाळीस ते पन्नास हँडसेट, मोबाईल असेसरीज, ४० ते ५० हजार रोख रक्कम लंपास केली तसेच रॉकी पवार यांच्या पवार मोबाईल या दुकानातून आठ ते दहा मोबाईल व २ ते ३ हजार कॅश चोरून नेली,याशिवाय अप्पा नेरकर यांच्या नेरकर ट्रेडर्स येथून वाईडीग साठी असलेली तांब्याची तार व बेरिंग तर मंगलचंद जैन यांच्या आशिष ट्रॅव्हल्स मधून किरकोळ रक्कम लंपास केली आहे.
सदर घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी येऊन पाहणी केली मात्र रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नव्हता,या घटनेने किरकोळ विक्रेत्यांना आर्थिक फटका बसून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सदर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.