
पोलीस अधिकारी व कायदेतज्ञांनी केले मार्गदर्शन...
अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन आवारात नवीन तीन कायद्यात भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष अधिनियम -२०२३ संदर्भात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
सदर चर्चा सत्रात मारवड पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील प्राथमिक माध्यमिक शाळाचे विद्यार्थी, शिक्षक,ग्रामीण भागातील सर्व पोलीस पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील, पत्रकार डॉ. विलास पाटील, शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील, हरिभाऊ मारवडकर,उपसरपंच भिकन पाटील,डी जी पाटील व परिसरातील ग्रामस्थ आदी हजर होते. सदर चर्चा सत्रात अमळनेर डीवायएसपी कार्यालयाचे विधी अधिकारी ऍड. संदीप बोरसे, अमळनेर न्यायालयाचे सरकारी वकील ऍड राजेंद्र चौधरी, ऍड संभाजी पाटील, मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय शितलकुमार नाईक यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास पीएसआय विनोद पाटील, राजेंद्र पाटील,सहाय्यक फौजदार फिरोज बागवान , हवालदार सुनील तेली, मुकेश साळुंखे, संजय पाटील, सचिन निकम, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील, तुषार वाघ, सुनील अगोने, महिला हवालदार रेखा इशी आदी पोलीस कर्मचारी हजर होते.




