
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागामार्फत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यात महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक दिव्यांग, मृत्यू, आत्महत्याग्रस्त व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून रुपये 18,000/- एवढी रक्कम विभागून दिलेली आहे. सदर योजनेचे धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी. आय.क्यू सी. प्रमुख प्रा. डॉ. पवन पाटील, एन. एस. एस. अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, मुख्य लिपिक श्री. जगदीश साळुंखे, श्री. सचिन पाटील, श्री. अतुल साळुंखे, श्री. दिलीप चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.




