
अमळनेर:- तालुक्यातील गांधली पिळोदा रस्तालगत असलेल्या सप्तशृंगी मंदिराजवळ भास्कर पारधी यांना ५० हजारांची रक्कम आणि ६ ग्रॅम सोन्याचे टोंगल असलेला डबा मिळाल्यानंतर त्यांनी इमानदारी दाखवून मूळ मालक शोधून काढत त्यांना ऐवज परत केला आहे.
भास्कर पारधी यांना मंगळवारी दुपारी डब्बा मिळून होता. तो डबा उघडून पाहिल्यावर त्यात ६ ग्रॅम सोन्याचे टोंगल आणि ३ बार चांदी असल्याचे दिसून आले. तपास केल्यानंतर हे सोने आणि चांदी नंदगाव येथील भारती प्रवीण पाटिल यांचे असल्याचे निश्चित झाले.त्यानंतर भास्कर पारधी यांनी भारती पाटिल यांना संपर्क साधून त्यांना हे सामान परत केले. भारती पाटिल यांनी भास्कर पारधी यांच्या इमानदारीची प्रशंसा केली आणि त्यांचा सत्कार केला.भास्कर पारधी हे पत्रकार गणेश चव्हाण यांचे मावस भाऊ आहेत.भास्कर पारधी यांनी दाखवलेली इमानदारी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.




