हाक देईल तेव्हा पाठीशी उभे रहा, मित्र परिवाराच्या मेळाव्यात केले आवाहन…
अमळनेर:- समाजाची सेवा करण हा माझा पिंड असून आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीसच टक्के राजकारण करतो,आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सर्व जण कामाला लागून केलेली विकास कामे व समाजपयोगी कामे गावागावात व घराघरात मतदारांना पर्यंत पोहचवा, ज्या ज्या वेळेस आपल्याला हाक देईल त्यावेळेस आपण आमच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंबिका मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात केले.
शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी मेळावा अंबिका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी होते.यावेळी पदाधीकाऱ्याशी संवाद साधताना मा.आ.चौधरी यांनी सांगितले की, मागील पाच वर्ष माझा मतदार संघ विकास कामात मागे पडला आहे, माझा २०१४ ते २०१९ चा कामाचा आलेख जनते समोर आहे. आज मी माजी आमदार जरी झालो तरी माझ्या परीने तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने विकास कामे आणण्याचा माझा प्रयत्न सुरूच आहे. ग्रामीण भागात असो वा शहरात असो. रस्ता, पथदिवेच्या माध्यमातून विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. कोरोना काळात माय-बाप जनता जनार्दनाची सेवा आपण करण्याचा प्रयत्न केला त्यात मात्र राजकारण झाले, रेमडीसिव्हरच्या नावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र एक गुन्हा काय शंभर गुन्हे दाखल झाले तरी अश्या गुन्ह्यांना मी भिक घालत नाही असे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवक गुलाब पाटील यांनी मनोगतात आता रडायचं नाही, लढायचं आहे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.रवींद चौधरी यांनी सांगितले की, शिरीषदादांविषयी विरोधक चुकीची वल्गना करत आहेत. असे वल्गना करणारे बरेच बघितले. त्याकडे लक्ष न देता शिरीष चौधरी विजयी कसे होतील ? हेच काम आपल्याला आतापासून करायचं आहे. मागील दोन पंचवार्षिक पासून आपण सर्वजण दादांना सोबत आहात व भविष्यात देखील राहाल यात तीळ मात्र शंका नाही. आपण शिरीष दादांच्या हाकेला साथ द्या, हि विनंती केली.
सुरवातीला प्रास्ताविक प्रवीण पाठक यांनी केले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पारोळ्याचे गोकुळ चौधरी, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, पारोळा शेतकी संघ संचालक व म्हसवेचे सरपंच सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पाटील, माजी संचालक शिवाजी गोसावी, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, माजी नगरसेवक श्रीराम चौधरी, सलीम टोपी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, वसंतनगरचे बबलू जाधव,अवि जाधव, नीमचे माजी सरपंच भास्कर चौधरी, बाळासाहेब संदानशिव, उत्तम वानखेडे, अधिकार सैंदाणे, कैलास भिल, महेंद्र भिल, प्रताप पारधी, आरिफ भाया, चंद्रकांत साळी, गोपीचंद कोळी, संतोष लोहरे,महेश जाधव, विजय भोई, पंकज भोई, रमेश धनगर, मांडळचे जितू पाटील, अक्षय अग्रवाल, दिनेश मणियार, मनोज शिंगाने, हरी भिका वाणी, राकेश गुरव, नाना धनगर उपस्थित होते.
आमची राम लक्ष्मण ची जोडी तुटणार नाही-डॉ.रविंद्र चौधरी…
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.रवींद चौधरी म्हणालेत कि, शिरीषदादा विषयी विरोधक चुकीची वल्गना करत आहेत, असे वल्गना करणारे बरेच बघितले आणि संपूनही गेले मात्र आम्ही दोन्ही बंधू म्हणजे राम लक्ष्मणची जोडी आहे. सत्तर वर्षच काय सातशे वर्ष पण हि जोडी तुटणार नाही फुटणार नाही. येथील जनतेने आमच्या परिवाराला दिलेले प्रेम आम्ही कदापि विसरणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.