महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ गळ्यात आपल्या टाकून घेण्यासाठी अनेकांना गोड स्वप्ने पडु लागली आहेत.अर्थात लोकशाही आणि निवडणूक म्हटली तर मैदानात अनेक जण उतरणारच कारण आमदारकीचा बहुमान कुणाला नकोय ?, परंतु अमळनेर मतदारसंघात केवळ आमदार निवडणे असा विषय राहिलेला नसून या मतदारसंघाचा दर्जा जरा वाढलेला आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान असलेले भूमिपुत्र नामदार अनिलदादा पाटील होय. या पंचवार्षिक मध्ये मतदारसंघाचा शाश्वत विकास काय असतो? आपला आमदार राज्याच्या मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर विकासात्मक दृष्ट्या मतदारसंघाचा काय लाभ होतो? हे आम्ही प्रथमच अनुभवले असुन असा योग कायमस्वरूपी आपल्याकडे असावा असे प्रत्येक नागरिकाला वाटू लागले आहे. म्हणून येणारया विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात साऱ्यांचा एकच नारा असणार आहे तो म्हणजे,, आता एकच नांदी,,,,,मंत्रीमहोदयांच्या शाश्वत विकासाला देणार पुन्हा संधी,,,
मंत्री महोदयांची विकासाची गती पाहता अमळनेर मतदारसंघात येणारी निवडणूक ना जात, ना धर्म, ना पैसा, ना प्रलोभन अश्या कुठल्याही मुद्द्यावर न होता केवळ आणि केवळ विकासाच्या आणि दूरदृष्टीच्या मुद्द्यावर झाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. अमळनेर तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणारा प्रकल्प म्हणजे निम्न तापी पाडळसरे धरण, खरेतर हा प्रकल्प कधी पूर्ण होणारच नाही असे मत जवळपास साऱ्यांचेच झाले असताना अनिल दादांनी आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच याची फाईल उघडून आपल्या अभ्यासू वृत्तीने पाठपुरावा सुरू केला आणि याचेच फलित म्हणजे महाराष्ट्र शासनाने दरवर्षीच्या बजेटमध्ये या धरणाला समाधानकारक निधी दिल्याने कुठेतरी धरणाच्या कामाला गती मिळाली, साडेचार वर्षांपूर्वी धरणाची स्थिती आणि आज रोजी बदललेले रूप कुणीही प्रत्यक्ष जाऊन पाहू शकतात. परंतु केवळ राज्य शासनाच्या निधीतुन हे धरण पूर्ण होणे अशक्य आहे याची कल्पना अनिल दादांना असल्याने केंद्र शासनाच्या योजनेत धरणाचा समावेश होण्यासाठी त्यांनी अहोरात्र पाठपुरावा केला. यासाठी सर्वात मोठे काम म्हणजे शासन दरबारी आपले संपूर्ण वजन वापरून धरणाची चौथी सुप्रमा राज्य शासनाकडून गेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेतली. खरेतर जल्लोष करण्याचाच हा क्षण असल्याने त्यावेळी मतदारसंघात अनेकांनी जल्लोष देखील साजरा केला. कदाचित अनिल दादा तेव्हा मंत्री नसते तर सुप्रमा मार्गी लागली नसती असे मंत्रालयातील अधिकारीही सांगतात. त्यानंतर धरणाची फाईल केंद्र शासनाकडे गेल्यानंतर मंत्री महोदयांनी दिल्लीच्या वाऱ्या सुरू केल्या, येथेही मंत्री पदाचेच वजन कामी आले, राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी प्रत्येक वेळी त्यांना भेटीची वेळ देऊन उत्तम प्रतिसाद देखील दिला आणि सुदैवाने केंद्रीय जलआयोगाची मान्यता देखील आपल्या धरणाला मिळाली असून आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे धरणाचा केंद्रीय योजनेत म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश होण्याची. तो दिवस देखील आता दूर नसून महाराष्ट्र राज्याचे एक कॅबिनेट मंत्री याचा पाठपुरावा करीत असल्याने लवकरच तो दिवस उगविणार आणि न भूतो न भविष्यती असा जल्लोष अमळनेर मतदारसंघात साजरा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तसे संकेतही खान्देशपुत्र तथा विद्यमान केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर. पाटील साहेबानी दिले आहेत.
एकीकडे धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा आणि दुसरीकडे मतदारसंघात विकासाची गंगा, ग्रामिण भागात प्रत्येक गावाला निधी, शहरात असा एक प्रभाग नाही तेथे विकासाचे काम नाही. बोरी व पांझरा नदीवर लहान मोठे बंधारे असतील, शहरात नवीन प्रशासकीय इमारतीचे सुरू असलेले काम असेल, अमळनेर एस.टी महामंडळ आगराचे नूतनीकरण असेल, दगडी दरवाजाचे पुनर्निर्माण असेल, मंगळग्रह मंदिरासह इतर देवस्थानच्या विकासासाठी निधी असेल, क्रीडा संकुलासाठी भरीव निधी असेल, गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्णत्वास येत असलेल्या पाणीपुरवठा योजना असतील किंवा शहर व ग्रामीण भागात अवतरत असलेली नव्या रस्त्यांची मालिका असेल ही भरीव विकासकामे मतदारसंघासाठी खरोखरच मोठी भेट असून दादांनी आतापर्यंत आणलेल्या निधीचा एकत्रित आकडा काढल्यास निश्चितच साऱ्यांचे डोळे चक्रावणार यात शंका नाही. विविध आपत्तीत नुकसान भरपाई पोटी देखील सर्वाधिक पैसा आपल्याच मतदारसंघात शेतकरी बांधवाना मिळाला आहे.
आपला आमदार मंत्री झाल्यानंतर याच पध्दतीचा भरघोस विकास जर होत असेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत फक्त आमदार का निवडावा, आम्हाला कुणाला निवडायचेच असेल तर आम्ही मंत्र्यांनाच पुन्हा निवडणार असा मतप्रवाह आता मतदारसंघात होताना दिसत असून भविष्यात मंत्रीपदाचे दावेदार फक्त अनिल दादाच राहू शकतात हे देखील स्पष्ट आहे. अमळनेर मतदारसंघात आतापर्यंत अनेक आमदार झालेत, काहीनी दोनदा तर काहींनी हॅट्रिक साधली मात्र मंत्रीपद काही कुणी पदरात पाडु शकले नाहीत. मंत्री पदासाठी हा मतदारसंघ आसुसलेला असताना आपले भूमिपुत्र आमदार अनिलदादा यांनी सुरवातीचे अडीच वर्षे विधान भवनात अतिशय दमदार अशी कामगिरी करून दाखविल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा यांना ते भावले. अनिल दादांची असलेली अभ्यासूवृत्ती आणि विधान भवनात बोलण्याची धमक व सक्षम नेतृत्व गुण या सर्व बाबींचा विचार करता अजित दादांनी त्यांना थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी स्थान दिले. सुरवातीला तालुका पातळी पर्यंत सीमित असलेला हा नेता केवळ आपल्या कौशल्याने आता थेट राज्यस्तरीय पातळीवर जाऊन पोहोचला असून एव्हढे मोठे स्थान नजीकच्या काळात कुण्या अन्य चेहऱ्याला मिळणे अवघडच आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी अन्य कुणाचे नाव घेणेही मूर्खपणाचे असून या मतदारसंघाला पुन्हा मंत्रीपदाचा बहुमान हवा असेल तर भूमिपुत्र अनिलदादा शिवाय पर्याय नाही, हे 1001 टक्के सत्य आहे.तेव्हा देऊया पुन्हा एकच नारा, भूमिपुत्राशिवाय नसेल कुणाला थारा…दादासाहेब आपणास वाढदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा…:- भोजमल मालजी पाटीलसंचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर