अमळनेर:- येथील शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व ऍड ललिता पाटील इंटरनेशनल स्कूल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ऍड ललिता पाटील इंटरनेशनल स्कूल,चोपडा रोड अमळनेर येथे करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ तर अध्यक्ष स्थानी ऍड ललिता पाटील स्कूलच्या अध्यक्ष ऍड ललिता पाटील असणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायेट चे प्राचार्य डॉ अनिल झोपे, उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण,सचिन परदेशी,नरेंद्र चौधरी,फिरोज पठाण,एजाज शेख,प्रतिमा सानप,विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व प्रा श्याम पाटील उपस्थित राहणार आहेत.तर बक्षीस वितरण प्रांतधिकारी नितीन मुंडावरे, प स चे गटविकास अधिकारी एन आर पाटील,तहसीलदार रुपेश कुमार सुराणा,पोलीस निरीक्षक विकास देवरे,न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर व ऍड ललिता पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
प्रदर्शनात साहित्य मांडणी 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता तर बक्षीस वितरण दुपारी 3 वाजता होणार आहे.शिबिर यशस्वितेसाठी तालुका विज्ञान समन्वयक निरंजन पेंढारे,गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष डी ए धनगर, शालेय पोषण आहार अधीक्षक भूपेंद्र बाविस्कर,तसेच डी के पाटील,एस के पाटील,प्राचार्य डॉ नीरज चव्हाण, पराग पाटील,सर्व केंद्र प्रमुख व सर्व कर्मचारी गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर, तालुका विज्ञान मंडळ व गणित अध्यापक मंडळ,मुख्याध्यापक संघटना व शिक्षक संघटना परिश्रम घेत आहेत.