अमळनेर:- शहरातील रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधून एक तर बस स्थानकासमोरील हॉटेल बाहेर लावलेली एक अशा २ दुचाकी शहरातून चोरांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गलवाडे रस्त्यावरील प्रोफेसर कॉलनी भागात राहणारे कुणालसंतोषी सातपुते हे १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या बहिणीसह रेल्वेने जळगाव जाणार होते.त्याआधी ते घरून स्टेशन वर जाण्यासाठी त्यांची हिरो होंडा शाईंन कंपनीची( एमएच – १९ – डिजे ४३२४) दुचाकीने गेले.तिथे त्यांनी पार्किंग मधे वाहन लावले.व रेल्वेने दोघे जळगाव येथे गेले.सायंकाळी ७ वाजता अमळनेर रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचले असता त्यांना त्यांची मोटारसायकल आढलून आली नाही.तेथील सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता तीन अज्ञातांनी गाडी लंपास केल्याचे दिसून आले.सातपुते यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत शहरातील नितीन दीक्षित हे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या मित्रासोबत बसस्थानक समोरील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असताना त्यांनी त्यांची हिरो कंपनीची मोटारसायकल (एम एच -१९ डिपी ८३८५) ही हॅण्डल लॉक करून हॉटेल बाहेर लावून ते आत जेवायला गेले.रात्री ९ वाजता जेवण करून बाहेर आले असता त्यांना मोटारसायकल आढळून आली नाही.इतरत्र शोध घेतला असता त्यांना मोटारसायकल कुठेही दिसली नसल्याने नितीन दीक्षित यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोहेको नाना पवार व पोहेकॉ अशोक पवार हे करत आहेत.