अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव करणखेडा येथे दिनांक 19 ते 25 डिसेंबर दरम्यान सुरू असून आज तिसऱ्या दिवशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांकडून ग्राम प्रबोधन पर मतदार जनजागृती व बालविवाह प्रतिबंधक पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन केले.
गावातील मुख्य चौकात ,आदिवासी वस्तीत विद्यार्थ्यांनी प्रबोधन पर नाटिका सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली.
दुपारच्या सत्रात महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा . डॉ. दिलीप कदम यांनी इंडिया कडून भारताकडे या विषयावर विद्यार्थी व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. दुसरे वक्ते म्हणून महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.माधव वाघमारे यांनी शाश्वत विकास या विषयावर समाजसेवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी व पुरुष यांनीही उपस्थिती दिली. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. अध्यक्षस्थानी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे होत्या. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ .किशोर पाटील यांनी मानले.