
इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन तपासणार,शाळांना प्रश्नपत्रिका संच वाटप..
अमळनेर:- शाळेचे विद्यार्थी दरवर्षी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेशित होत असले तरी या विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादन केले आहे किंवा नाही याची पडताळणी होणार असून यासाठी 10 ते 12 जुलै दरम्यान तालुक्यातील सर्व माध्यमांच्या इयत्ता तिसरी ते नववी पर्यंतच्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे.
त्या दृष्टीने अमळनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तालुक्यातील शाळांना प्रश्नपत्रिकांचे संच वाटप करण्यात आले. स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पेट अंतर्गत प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा या विषयांच्या परीक्षा या अंतर्गत होणार आहेत. या चाचणीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त आहे आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास यातून मदत होणार आहे.या चाचणी साठी संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे.




